"अमेरिकेचा अंत पाहू नका. तुम्ही बनवत असलेली आण्विक शस्त्रे ही तुम्हाला सुरक्षित करत नाहीत, तर तुमच्या कारकिर्दीला आणखी गंभीर धोक्यात घालत आहेत," असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे आक्रमक अध्यक्ष किम जोंग ऊन यांना सज्जड दम भरला आहे.
उत्तर कोरियाविरुद्ध ट्रम्प यांनी आतापर्यंतची सर्वांत कठोर भाषा वापरली. जगभरातील देशांनी उत्तर कोरियाला कोणत्याही स्वरुपातील मदत, पुरवठा किंवा स्वाकारार्हता देऊ नये असे जाहीर आवाहनही त्यांनी केले.
दक्षिण कोरिया दौऱ्याची सांगता करताना ट्रम्प यांनी राजधानी सौल येथे संसदेत भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले, "अमेरिकेला कमी लेखू नका किंवा आमचा अंत पाहू नका."
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews